Tuesday, August 21, 2012

आज फिर जिने कि तमन्ना है....

गाईड सिनेमात वहिदा रेहमान हे गाण गाते.  तेंव्हा तिला तिच्या कंटाळवाण्या जगण्याला नवी उमेद, नवी आशा मिळाली असते. Arrange Marriage मधला हा टप्पा अगदी असाच असतो.लग्नासाठी सज्ज झालेलो आपण जेंव्हा या सत्याला सामोरे जातो, की जवळच्या लोकामध्ये काही आपली लग्नाची डाळ शिजणार नाही. तेंव्हा आपल्या मनाला आलेली काहीशी निराशा, स्वतःबद्दल  आलेला infirioirity complex यामुळे पुरता नाहीसा होतो. तर आता  तुम्हाला  उत्सुकता  लागून  राहीली  असेल  की हा कुठला टप्पा बर्र ?? 
तर हा टप्पा असतो आपली लग्नाची दावेदारी आपल्या नातेवाइकान्च्या जगाच्या बाहेर जाहीर करण्याचा. ज्या विवाह संस्थेचा दिव्य form आपण भरला असतो ते आपली माहिती अतिसुंदर विशेषणां सकट त्यांच्या मासिकात/ रेजीस्टार/ किंवा आजकाल ची devlopment म्हणजे त्यांच्या website वर टाकतात. आणि  विशेषणे पण कशी??मुलाच्या बाबतीत उंच ,उच्चशिक्षीत ,निर्व्यसनी (हा हा हा ) आणि  मुलगी  असेल  तर  सुंदर, उजळवर्ण, शालीन , सुसंस्कृत,  गृहकार्तव्यदक्ष   अशा  शब्दबंबाळ  विशेषणांनी नटून आपले SO CALLED MARRIAGE PROFILE  तयार  होते.आणि कुठल्याश्या मासिकात छापून  येते.  आई  वडिलांच  उर  तो  मजकूर वाचून  भरून  येते  जणू  काही  मुलगा  बोर्डात  आला  कि  काय  असे  समजून  ते  तो  मजकूर  चार  चारदा वाचतात.
मग जैसे पूरी कायनात बस इसी लम्हे का इन्तेजार कर रही थी अशा  रीतीने आपल्याला attention मिळते. अचानक सकाळ ,  दुपार , संध्याकाळ घराचे फोन खणखणू लागतात. चारी बाजूनी स्थळांचा पाउस पडू लागतो. लग्नाच्या  तळ्यातील  आपण  कुरूप  पिल्लू  नसून  राजहंस  असल्याची भावना मनात जागृत होते. आई  वडील वधू अथवा वर पित्यांना  फोटो आणि पत्रिका पाठवायची विनंती करू लागतात. आणि मग आपल्या मनात पुढची स्वप्नचित्रे दिसू लागतात. कि पुढच्या 8 दिवसातच आपल्या आयुष्यभराचा जोडीदार आपल्या समोर असणार आणि मग फक्त  सुख, सुख आणि  सुखच.
लग्नाच्या बाजारात अचानक प्राप्त झालेल्या मागणीने हुरळून जाऊन आपण ही गाऊ लागतो की सचमुच आज फिर  जिने  कि  तमन्ना  है.... लेकीन  दोस्त  ये  शादीका  बाजार  भी  बडी  अनोखी  चीज  है. आने  वाले दिनो  मी  वोह आपसे येभी  बुलावायेगा  कि  आज  फिर  मरने   का  इरादा  है.... बस  किस्मत किस्मत  का खेल  है  दोस्त आगे आगे देख होता है क्या!!!!!

Wednesday, August 8, 2012

फॉर्म घालवणारा फॉर्म

नमस्कार कसे आहात? तुमच्या सगळ्यांचा चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह मी समजू शकतो. बर्याच दिवसानंतार Arrange Marriage  बद्दल लिहितो आहे त्याचे कारण  तसेच आहे हो कारण Arrange Marriage  च्या ज्या टप्प्या बद्दल मी  लिहणार आहे तो टप्पा यायला ही बराच वेळ लागतो. तेंव्हा तो feel  येण्यासाठी हा एवढा gap घेतला. तर घर कि मुर्गीच्या किंवा बकर्याच्या शोधात बाहेर पडलेले आई वडील जेंव्हा या निष्कर्ष वर येऊन पोचतात कि आपल Sample ओळखीच्या ओळखी मध्ये कुठे खपत नाहीये तेंव्हा ते मोर्चा वधू-वर सूचक मंडळाकडे वळवतात.
आणि मग आपल्या समोर येतात अतरंगी विवाह   सतरंगी Registration  Forms. एखादा खेळाडू त्याच्या खेळाच्या ऐन बहरा मध्ये आपला Form  हरवून बसल्या प्रमाणे आपली अवस्था होते. लग्नासाठी एवढे सज्ज झालेले आपण तो फोरम पाहून च गप गार होतो. तर अस या फॉर्म्स मध्ये असते तरी काय? काही विशेष नाही फक्त लग्ना संदर्भात काही क्षुल्लक प्रश्न असतात जसे की
स्वतः बद्दल ची माहिती:-
1. आपला रंग कसा आहे ?
पर्याय :- अ. गोरा     ब. निमगोरा  क.गव्हाळ  ड.सावळा  ई. काळा
(या नंतर आपण तास न तास आरश्यात पाहू लागतो वरील पैकी कुठली रंगचाता आपल्या चेहर्याशी मिळते.)
2. आपल्याला काही व्यसन आहे का ? असल्यास कोणते आणि ते आपण किती वेळा करता
 पर्याय :- अ. दररोज ब. दरआठवड्याला  क.महिन्यातून एकदा   ड.सहामहिन्यात एकदा ई. वर्षातून एकदा
(मुळात या प्रश्न चे खरे ऊत्तर  आई वडील यांचा समोर त्याच्या frequency सकट लिहिणे म्हणजे वाघांचेच काळीज हवे)
हे झाले स्वतः बद्द्दल चे प्रश्न जोडीदार बद्दल चे प्रश्न म्हणजे कळसच असतात.
1.जोडीदार कसा असावा?
1. जाड 2. सुदरूढ 3. सडपातळ 4. काटक 5 कृश
( आपण कसे ही आकारमानाने असलो तरी कोण म्हणेल मला जाड जोडीदार हवा कुणी हि हेच लिहणार ना की सडपातळच जोडीदार हवा)Same तऱ्हां रंगाची कोण लिहील आम्हाला केनयाच्या नागरिकाशी मिळत्या जुळत्या रंगाचा जोडीदार हवा म्हणून. अशा  अनेक  अतरंगी  प्रश्नांची उत्तरे लिहून  finally  आपला Arrange Marriage चा daily soap after short break पुन्हा चालू होतो आणि या भागात जे काही Twists, turns आणि  drama घडतो त्याचा आपण कधी स्वप्नात देखील विचार केला नसतो... मेरे दोस्त  This is real arrange marriage… get ready for roller coaster ride पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लोग मध्ये लवकरच

Friday, May 4, 2012

घर की मुर्गी....

घर की मुर्गी....
Arrange Marriage मध्ये आई वडिलांचा एक जगावेगळा हट्ट असतो कि होणारी सून अथवा जावई हा  महितातला  अगदी  रोजच्या  पाहण्यातला  असला  पाहिजे.  का  विचारलं  तर  म्हणे  माहिती  मधला  मुलगा  अथवा  मुलगी  असली  की  भविष्यातली  Risk  कमी  होते.  मला  एक  कळत  नाही  दररोज  आपल्या समोर वावरणारी ही मुले आणि मुली उत्तम पती अथवा  गृहिणी  होतील  हे  कशा  वरून?  असे  असत तर विवाह जुळवणाऱ्या संस्था ओसच पडल्या असत्या ना?? पण नाही  हट्टाला  पेटलेल्या  आई  वडिलांना  समजावणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्या प्रमाणे असते तेंव्हा या फंदात न पाडलेल च बर.
तर मिशन घर की "मुर्गी" अथवा "बकरा" शोधण्याचे काम सर्व जण सुरु करतात. यात पहिले टार्गेट असतात आई वडिलांच्या मित्र मैत्रिणीची मुले व मुली (सौजन्य हिंदी सिनेमासृष्टी जे दोस्ती को रीश्तेदारी मध्ये बदलण्याचे फुटकळ प्रकार दाखवतात) त्या मध्ये सुद्धा मुले मुली अनेक असतात त्यातल्या त्यात आई वडिलांना कोण आवडतात यावर सगळा खेळ अवलंबून असतो. या सगळ्या  Selection  Process मध्ये केवळ मुलगी अथवा मुलगी चांगले असून चालत नाही तर त्यांच्या आई वडिलांबरोबर असणारे संबंध ही खूप महत्वाचे असतात  नाहीतर  आपल्याला  आवडणाऱ्या  मुलीच्या  आणि  आपल्या आई चा ३६ चा आकडा असेल तर ब्रम्हदेव ही  खाली  येऊन  तुमचे  लग्न  जुळवू  शकत   नाही. तर एकदा ही दोस्ती रीश्तेदारी front  वर आई वडिलांना अपयश आले की मग आई बाबा मोर्चा नातेवाईकाकडे वळवतात. मग आईच्या  आत्ये  बहिणीच्या  चुलत  नणंदेची  मुलगी,  बाबांच्या  मामींचा  बहिणीचा मुलगा अशी दूर दूर वर आपली स्थळे जातात. त्यातल्या त्यात आई  वडिलांनी  कुठल्या  लग्नात पाहिलेली ती हिरव्या साडीतली मुलगी किंवा चष्मेवाला तो मुलगा असे शोध सुरु होतात. लहान बहिण भाऊ असतील तर ते ही त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या भावंडाना सुचवून मोकळे होतात. या सगळ्या मध्ये आपल्याला मात्र आपले मत देण्याचा अधिकार कुठेच नसतो आपण मात्र रोज एका नवीन ठिकाणी आपले सुंदर सुंदर photos आणि पत्रिका पोस्त करण्याचे काम अतिशय उत्साहाने करायचे असते.
तरी त्यातला त्यात आपल्याला विचारले की बाबा रे तूला कुणी आवडली आहे का आपल्या महितातली तर आपल्या कडे उत्तर च नसते कारण आपली झेप फार फार तर वाहिनीच्या बहिणी पर्यंत ( सांगायला नको सौजन्य हम आपके है कौन) नाहीतर तिच्या मैत्रिणी पर्यंत पण तिथे ही आपली कीर्ती इतकी चांगली पोहोचली असते की पुन्हा आई वडिलांचा अपमान नको म्हणून आपण गप्प बसतो.
तर या टप्प्या मध्ये ज्या लोकांचे लग्न जुळते त्यांनी मागील जन्मी मोती दान केले आहे असे नक्की समजावे कारण ओळखीतून लग्न जुळणे हे तुमच्या लेखी तेवढे पुण्य जमा असेल तरच होते. आणि अशा वेळी आई वडिलांना सिकंदराला नवा देश सापडल्या नंतर जितका आनंद होईल तितका आनंद, अभिमान आणि गर्व होतो. आणि ज्यांचे लग्न या टप्प्यात जुळत नाही त्यांनी समजावे अजून त्यांच्या पापाचा हिशोब चुकता व्हायचा आहे आणि येणाऱ्या काळात तो होणार हे नक्की.....
येह तो ट्रेलर है....पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त......
अधिष

Thursday, April 12, 2012

भैया जी ईस्माईल :-)

भैया जी ईस्माईल :-)
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना आता हे काय नवीन? अहो!! नवीन काही नाही ही तर पहिली पायरी आपली उमेदवारी लग्नाच्या निवडणुकीत जाहीर करण्यासाठी. तुम्हाला अजूनही झेपलेल दिसत नाहीये मला सांगा भैया जी स्माईल हा आवाज आपण कधी ऐकतो जेव्हा आपण फोटो काढायला  जातो Right आणि जर Arrange Marriage च्या प्रोसेस मध्ये तुमचे लग्नाळू फोटो नाही काढले तर गाडी पुढे जाणार कशी?
तर ही Arrange Marriage या आपल्या प्रवासाची पहिली पायरी. ही जर तुम्ही नीट चढलात तर पुढचा प्रवास अतिशय सुखकर होतो. तर Arrange Marriage च्या या टप्प्यामध्ये आपली संमती मिळाली की आपल्या घरातील मंडळीना अचानक आपल्या सोन्या किंवा छकुली किती सुंदर, देखणे, रुबाबदार आहेत हे जगाला दाखवायचा उत्साह संचारतो. त्यांच्या डोळ्या समोर असतो तो सोन्या किंवा छकुली वय वर्षे ५ वाला ज्याला ते न्हाऊ माखू घालून छान कपडे घालून Studio मध्ये फोटो काढायला नेत असत. पण जेंव्हा ते या same अपेक्षा घेऊन त्यांच्या लग्नाळू मुला कडे किंवा मुली कडे येतात तेंव्हा त्यांना कमालीच्या अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागते( म्हणून मी म्हणतो अपेक्षा भंगाचे दुख्ख सर्वात मोठ्ठे असते) चिरंजीव फाटकी Jeans ( त्यांच्या मते) , अतरंगी Tshirt , किंवा वाढलेले ,केस सुटलेली ढेरी असा असतो. तर सुकन्या ने लांबसडक केसांना कात्री लावलेली असते, कानात हातात तऱ्हे तऱ्हेच्या रिंग्स, bands घातलेले असतात, हाताची नखे सप्तरंगी Nailpolish ने माखलेली असतात. आणि मग हा सारा प्रकार पाहून आई बापाला आपली पोरे सोन्या किंवा छकुली न वाटता केवळ "ध्यान" वाटू लागतात. आणि मनात एकाच प्रश्न घुमत असतो तो म्हणजे आपल्या या "ध्यानाशी"  लग्न कोण करणार???
आणि मग सुरु होतो एक जब्बरदस्त Makeover कार्यक्रम खास लग्नाच्या फोटो साठी. अगदी Beauty Treatment पासून Weight Loss Treatment  पर्यंत सगळ काही आई वडील पैशाचा विचार न करता करू लागतात कारण ते केवळ एकाच ध्येयाने झपाटलेले असतात काहीही करून आपल्या VTV ,MTV मुलाला अथवा मुलीला संस्कार Channel बनवायचे. मग अथक प्रयत्न, काटेकोर शिस्त, बंधने यातून त्यांना हवा तसा पोळ्याचा बैल सजतो लग्नाच्या शर्यतीत उतरण्यासाठी.
आणि मग Finally तो दिवस उगवतो ज्या साठी इतके सारे दिव्य केले जाते Yess फोटोसेशन चा दिवस. मग काय आपल्याला ठेवणीतले कपडे घालून( मुलींना नटवून) फोटोग्राफर  नामक  रिंगमास्तर  समोर  उभे केले जाते. आणि मग तो सांगेल तशा कसरती आपणा  कॅमेरया समोर करू लागतो. त्यामागे उभे असलेले आई वडील कौतुकाने जणू आपला मुलगा साहसी प्रात्याक्षिके  करतो आहे(खर म्हणजे असे फोटो काढणे हे खरच मोठ्ठे साहस असते) अशा कौतुकात उभे असतात.
मग आपण सरळ, तिरके उभे राहून जेणे करून उंची कळावी, एक गाल वाकडा करत हसून, मुली मोठ्ठ्या केसांची जाहिरात करत, गालावर बोट ठेवून, अशा दिव्य Poses मध्ये फोटो देतो. ह्या Pose ज्याने कुणी पहिल्यांदा शोधल्या असतील ना त्या दिव्य आत्म्याला मला विचारायचे आहे बाबारे !! तू तरी अशा  Poses  मध्ये  फोटो काढले  आहेत  का  रे  ?  उत्तर  नाही  असेच  असणार  कारण  जर त्याला कळले असते हे किती  कष्टदायी काम आहे तर त्याने त्या शोधल्याच नसत्या.
चला आता पहिली पायरी तर चढून झाली लाग्नाच्च्या सुपर मार्केट साठी आपले फोटो रुपी Pamplet रेडी झाले आहे. आता पुढे काय??? पुढच्या Blog मध्ये तोपर्यंत हसत रहा.
GoodBye Take Care 
अधिष
  

Monday, April 2, 2012

The Do 's & Dont 's of Arrange Marriage

The Do 's  & Dont 's of Arrange Marriage
तर मंडळी आता आपण Arrange Marriage या जीवन परिवर्तन करणाऱ्या प्रक्रियेला तयार होतो. तर हा सारा प्रवास सुखकर व्हावा यासाठी काही गोष्टी कटाक्षाने करणे गरजेचे आहे आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळणे ही तितकेच महत्वाचे आहे.
So Ladies & Gentlmen Presenting The Do 's  & Dont 's of Arrange Marriage
  1. Arrange Marriage मध्ये येणारी मुलगी अथवा मुलगा हा कुणाचा आधीचा boyfreind अथवा girlfriend आहे आणि त्यांचे पुढे काही होऊ शकले  नाही म्हणून ते Arrange Marriage ला आले आहेत असा विचार बिलकुल करू नये. कारण सगळेच प्रेमात पडावे इतके नशीबवान ( अथवा कमनशिबी) नसतात.
  2.  सगळ्यात पहिले आणि महत्वाच म्हणजे   Arrange  Marriage  च्या बाबतीत आपला stand हा अतिशय balanced  हवा  अतिउत्साह दाखविल्यास " उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग" असे बोलले जाते तर टोकाचा निरुत्साह दाखवल्यास उद्धट, उर्मट, शिंग फुटलेला, बेजबाबदार असे बोल ऐकावे लागतात In Short  काय दोन्ही बाजूने  आपलाच ढोल वाजवला जातो So आपला Stand हा कायम Balanced हवा.

  3. किमान आपले लग्न ठरे पर्यंत आपण आणि आपल्या घरच्यांना लग्नाळू चित्रपट,मालिका उदाहरणार्थ हम आपके  हैं  कौन,  विवाह,  मालिकांमध्ये  एका लग्नाची दुसरी गोष्ट, बडे अच्छे लगते हैं etc  .... यापासून कटाक्षाने दूर ठेवावे. कारण अशा गोष्टी पाहून त्यांचा मध्ये निर्माण होणारा उत्साह आणि स्वप्ने थोपवणे महाकठीण प्रकार असतो. पडद्या वरचा कलाकार पैसा घेऊन Arrange Marriage ची खोटी स्वप्ने त्यांचा मनात पेरतो पण ती स्वप्ने फुकट मध्ये आपल्यलाला पूर्ण करावी लागतात.
  4. लग्न होईपर्यंत कट्ट्या वरून जाता येता  दिसणाऱ्या So Called " Wife  Material "  मुली   अथवा "Husband Material " मुलांकडे ढुंकून ही पाहू नये. कारण अश्या मुली अथवा मुले Arrange Marriage  च्या प्रोसेस मध्ये भेटणे मृगजळा प्रमाणे असते. ते हमखास पणे तेंव्हा भेटतात जेंव्हा आपले लग्न ठरते. आणि मग मनात प्रश्न येतो च्यायला लग्न ठरवत असतात तेंव्हा ही मुले मुली काय हरवलेली असतात. आणि एकदा का आपण कुणाला commit केले की पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे एकदम उगवतात. अशा वेळेस सय्यम आणि सबुरी ने स्वतास आवरावे कारण त्या शिवाय दुसरा कोणताही मार्ग नसतो.
  5. जेंव्हा दाखवण्याचे कार्यक्रम सुरु होतात आणि चुकून माकून आपल्याला आवडेल अशी मुलगी अथवा मुलगा समोर आला. तर अजिबात स्वप्न पाहणे सुरु करू नये. कारण ही दुहेरी प्रोसेस आहे आणि अपेक्षा भंगाचे स्वप्न सगळ्यात मोठे असते.
  6. इतरांचे Arrange Marriage चे गोड किस्से अजिबात ऐकू नयेत कारण मुळात ते गोड नसतात च मुळी तो केवळ एक खोटा भास असतो हे आपल्याला लग्न झाले कि कळते
  7. येणाऱ्या मुलीला अथवा मुलाला आपल्या आईशी, वडिलांशी अथवा इतर कुणाशीही compare करणे टाळावे. ही पुढील आयुष्यातील तंटामुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. ज्याची सुरुवात आत्ता पासून च करणे गरजेचे आहे.
  8. शेवटचे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे येणारा मुलगा किंवा मुलगी बाकीच्या लोकांना कसा वाटत्तो या पेक्षा आपल्याला Click होतो कि नाही याचा सर्वात अधिक विचार करणे गरजेचे आहे.
तर महाराजा Arrange Marriage चे हे Do 's  & Dont 's of Arrange Marriage तुझा पुढे पेश केले आता लवकरच Arrange Marriage चा खेळ सुरु करताय त्याला तुझी कृपा ठेव र बाबा!!!!!
क्रमशः
अधिष

Wednesday, March 28, 2012

वादळाची चाहूल......

वादळाची चाहूल.....
Arrange Marriage Process च्या वादळाची सुरवात अतिशय सुखद असते कारण सुरुवात आपल्या कौतुक सोहळ्याने होते. आता कशी ते पहा.
स्थळ असते एखाद्या समारंभाचे जिथे वर्षानुवर्षे आपल्या कडे न फिरकणारे नातेवाईक ( sorry sorry आपण त्यांना  तर्हेवाईक म्हणायचे ठरवले आहे)   आले  असतात.  तिथे  ज्या  काही  Typical  बेबी मावशी, किंवा बेबी आत्या किंवा बेबी आज्जी  type च्या बायका असतात त्या आपल्या आईला अथवा बाबांना म्हणतात '" काय रे तुझा थोरला/थोरली  लेक कुठाय ?" मग आपण कुठे तरी चकाट्या पिटत असतो तिथून आपल्याला बोलावले जाते आणि आपण अगदी आपल कुणी तरी सख्खा सोयरी भेटल्या प्रमाणे त्याना नमस्कार करतो. आणि मग चमत्कार घडतो '" कित्ती मोठठा झालास रे, किती उंच दिसतोस किंवा मुलगी असेल तर किती गोड दिसते आहेस अगदी आई वर गेली आहेस हो... असे म्हणून आपल्याला मूठभर मांस चढत तोच पुढचा बॉम्ब पडतो. ते सगळ ठीक आहे आता काय लग्नाच्या हालचाली सुरु केल्या कि नाही. वेळीच कर हो. लग्न होई पर्यंत चांगली वर्षे दोन वर्षे जातात. बर्र आमच्या नंदू ची नात/ नातू लग्नाची आहे सांगू का ?" अस म्हणल्या नंतर सगळ्यात मोठी अडचण होते ती आपली कि यावर Positive  Recation अपेक्षित आहे की Negative . आणि आपले आई बाबा आपल्या मुलाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्या प्रमाणे कौतुकाने पाहत उभे  असतात.
बस तो आपल्या आनंदा चा शेवटचा दिवस असतो. मग आई बाबा असेल तर धाकटा भाऊ बहीण अगदी CID  प्रमाणे आपल्यावर नजर ठेवू लागतात  कशासाठी म्हणून काय विचार करताय  अहो आपल कुठे काय प्रेम प्रकरण आहे का  याचा अंदाज घेण्यासाठी. मग आपण  वारंवार  कुणाशी  फोन  वर  बोलतो,  कोण  सतत  आपल्या  घरी  येत,  कुणाचा फोन आला अथवा कोण घरी आल्यावर आपण Excite होतो  या सगळ्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जाते.
आणि मग पूर्ण शहानिशा केल्या नंतर जेंव्हा त्यांना कळून चुकत की आपल कार्ट किंवा कार्टी कुणाच्या ही प्रेमात बिमात पडले नाहीयेत. एक दिवस रीतसर आपली शाळा घेतली जाते किंवा आपल्या भाषेत सांगायचे झाले तर सुमडीत खोपच्यात घेतले जाते आणि मग ही Arrange  Marriage  ची कडू गोळी आपल्याला गोड साखरेत घोळवून खायला घातली जाते. मग लग्नाचे महत्व, त्याची योग्य वेळ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण ते आत्ता का करणे गरजेचे आहे या वर प्रबोधन केले जाते. बर्र जर आपण पहिल्याच प्रयत्नात Convince  झालो तर ठीक आहे. नाहीतर मग तुझे कुठे जमले आहे का? कुणी आवडते का ? लग्न तरी करायचे आहे का असे अनेक प्रश्न सकाळ संधाय्काळ आपला पाठलाग करू लागत्तात. आपण दिलेले कोणतेही कारण त्यांना खरे वाटत नाही. आई Serial मधील लग्न पाहून आपल्या कडे साश्रुपूर्ण नयनांनी पाहू लागते, बाबा बोलायचे कमी होतात, लहान बहिण आपल्या लग्नात काय घालणार याचे Planning करू लागते जे अगदी च आवरर्रा असे असते.पण आपण फक्त हतबल पणे या सगळ्या कडे पाहत असतो. हे सगळे उपाय संपले की मग जवळचा मामा, काका, दादा किंवा लग्न ठरलेले मित्र मैत्रिणी सामुपादेशाना साठी येऊ लागतात. मग इतक्या साऱ्या लोकांचे प्रयत्न पाहून आपण च माघार घेतो आणि एकदाचे लग्नाला तयार होतो. आणि मग काय सगळी कडे जल्लोषाला उधाण येते. क्षणात आपण घरातले Celebrity होतो.
पण Actual मध्ये बळीसाठी बकरा मिळाला असतो. ह्या बकऱ्याचा हलाल होई पर्यंतचा प्रवास Step By Step पुढच्या ब्लोग्स मध्ये पाहू
तोपर्यंत Goodbye and Take Care 
अधिष

Monday, March 26, 2012

प्रास्ताविक

मित्रांनो गध्ध्ये पंचविशी ओलांडून आपण खऱ्या अर्थाने गृहस्थ आश्रमा साठी applicable होतो आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वांना आपले लग्न या अलौकिक वेडाने झपाटून टाकल जात. या सर्वामध्ये ज्याचे लग्न करायचे आहे तो जणू काही गीनिपिक असल्या प्रमाणे आजूबाजूचे सगळे लोक आपल्या वर लग्नाचे प्रयोग सुरु करतात. त्यात जर तुम्ही love marriage करत असाल तर बऱ्याच त्रासातून मुक्ती मिळते पण जे लोक Arrange Marriage करण्याचा निर्णय घेतात ( घेतात कसला घ्यावा लागतो) त्यांना मात्र Emotions , Expectations आणि Unusual Reactions च्या महादिव्यातून जावे लागते.
आज काल वर्तमान पत्रातून, मासिकां मधून So Called विवाह समुपदेशनाचे लेख वाचल्या नंतर असे वाटते जणू आपली पिढी बिलकुल Mature च नाहीये. जे काही कळत ते या जुन्या खोडांनाच. No Doubt या मोठ्या लोकांनी नक्कीच चार पावसाळे जास्त पहिले असतात, खूप कटू गोड अनुभव त्यांच्या पाठीशी असतात, आपले चांगले व्हावे हीच त्याच्या मागची भावना असते. पण याचा अर्थ असा नाही की आमची पिढी लग्नाच्या बाबतीत सपशेल मूर्ख आहे, आम्ही जबाबदार नाही. अगदी आधीच्या पिढी इतके नाही पण आम्ही ही चार कटू गोड अनुभव आम्हीही घेतले आहेत. आमचे ही काही म्हणणे आहे. आम्हाला ही लग्न करायचे आहे पण आमच्या पद्धतीने आणि दृष्टीकोनाने ईतकच
माझ्या blogs च्या माध्यमातून मला हेच म्हणणे सगळ्यांचा समोर मांडायचे आहे. तेंव्हा हा blog हा केवळ माझा blog नाही हा आपल्या सगळ्यांचा आहे. जिथे आपण आपले विचार, भूमिका मांडू शकू ज्या आपण कधी कधी प्रत्यक्ष जीवनात मांडू शकत नाही.
Arrange  Marriage  ची जाचक आणि बेभरवशाची वाटणारी ही Process एक आनंददायी आणि Rembering Process बनवण्या साठी हा एक छोटासा प्रयत्न. मला आशा आहे हे Blogs  कुठेतरी तुमचेच अनुभव वाटतील. तेव्हा जरूर याचा आनंद घ्या आणि तुम्हाला ही तुमचे अनुभव Share करायचे असतील तर नक्की करा Blog तुमचाच आहे.
चला भेटूयात मग एक नवीन विचार आणि दृष्टीकोन घेऊन....
तोपर्यंत Goodbye and Take Care
अधिष