भैया जी ईस्माईल :-)
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना आता हे काय नवीन? अहो!! नवीन काही नाही ही तर पहिली पायरी आपली उमेदवारी लग्नाच्या निवडणुकीत जाहीर करण्यासाठी. तुम्हाला अजूनही झेपलेल दिसत नाहीये मला सांगा भैया जी स्माईल हा आवाज आपण कधी ऐकतो जेव्हा आपण फोटो काढायला जातो Right आणि जर Arrange Marriage च्या प्रोसेस मध्ये तुमचे लग्नाळू फोटो नाही काढले तर गाडी पुढे जाणार कशी?
तर ही Arrange Marriage या आपल्या प्रवासाची पहिली पायरी. ही जर तुम्ही नीट चढलात तर पुढचा प्रवास अतिशय सुखकर होतो. तर Arrange Marriage च्या या टप्प्यामध्ये आपली संमती मिळाली की आपल्या घरातील मंडळीना अचानक आपल्या सोन्या किंवा छकुली किती सुंदर, देखणे, रुबाबदार आहेत हे जगाला दाखवायचा उत्साह संचारतो. त्यांच्या डोळ्या समोर असतो तो सोन्या किंवा छकुली वय वर्षे ५ वाला ज्याला ते न्हाऊ माखू घालून छान कपडे घालून Studio मध्ये फोटो काढायला नेत असत. पण जेंव्हा ते या same अपेक्षा घेऊन त्यांच्या लग्नाळू मुला कडे किंवा मुली कडे येतात तेंव्हा त्यांना कमालीच्या अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागते( म्हणून मी म्हणतो अपेक्षा भंगाचे दुख्ख सर्वात मोठ्ठे असते) चिरंजीव फाटकी Jeans ( त्यांच्या मते) , अतरंगी Tshirt , किंवा वाढलेले ,केस सुटलेली ढेरी असा असतो. तर सुकन्या ने लांबसडक केसांना कात्री लावलेली असते, कानात हातात तऱ्हे तऱ्हेच्या रिंग्स, bands घातलेले असतात, हाताची नखे सप्तरंगी Nailpolish ने माखलेली असतात. आणि मग हा सारा प्रकार पाहून आई बापाला आपली पोरे सोन्या किंवा छकुली न वाटता केवळ "ध्यान" वाटू लागतात. आणि मनात एकाच प्रश्न घुमत असतो तो म्हणजे आपल्या या "ध्यानाशी" लग्न कोण करणार???
आणि मग सुरु होतो एक जब्बरदस्त Makeover कार्यक्रम खास लग्नाच्या फोटो साठी. अगदी Beauty Treatment पासून Weight Loss Treatment पर्यंत सगळ काही आई वडील पैशाचा विचार न करता करू लागतात कारण ते केवळ एकाच ध्येयाने झपाटलेले असतात काहीही करून आपल्या VTV ,MTV मुलाला अथवा मुलीला संस्कार Channel बनवायचे. मग अथक प्रयत्न, काटेकोर शिस्त, बंधने यातून त्यांना हवा तसा पोळ्याचा बैल सजतो लग्नाच्या शर्यतीत उतरण्यासाठी.
आणि मग Finally तो दिवस उगवतो ज्या साठी इतके सारे दिव्य केले जाते Yess फोटोसेशन चा दिवस. मग काय आपल्याला ठेवणीतले कपडे घालून( मुलींना नटवून) फोटोग्राफर नामक रिंगमास्तर समोर उभे केले जाते. आणि मग तो सांगेल तशा कसरती आपणा कॅमेरया समोर करू लागतो. त्यामागे उभे असलेले आई वडील कौतुकाने जणू आपला मुलगा साहसी प्रात्याक्षिके करतो आहे(खर म्हणजे असे फोटो काढणे हे खरच मोठ्ठे साहस असते) अशा कौतुकात उभे असतात.
मग आपण सरळ, तिरके उभे राहून जेणे करून उंची कळावी, एक गाल वाकडा करत हसून, मुली मोठ्ठ्या केसांची जाहिरात करत, गालावर बोट ठेवून, अशा दिव्य Poses मध्ये फोटो देतो. ह्या Pose ज्याने कुणी पहिल्यांदा शोधल्या असतील ना त्या दिव्य आत्म्याला मला विचारायचे आहे बाबारे !! तू तरी अशा Poses मध्ये फोटो काढले आहेत का रे ? उत्तर नाही असेच असणार कारण जर त्याला कळले असते हे किती कष्टदायी काम आहे तर त्याने त्या शोधल्याच नसत्या.
चला आता पहिली पायरी तर चढून झाली लाग्नाच्च्या सुपर मार्केट साठी आपले फोटो रुपी Pamplet रेडी झाले आहे. आता पुढे काय??? पुढच्या Blog मध्ये तोपर्यंत हसत रहा.
GoodBye Take Care
अधिष