Wednesday, March 28, 2012

वादळाची चाहूल......

वादळाची चाहूल.....
Arrange Marriage Process च्या वादळाची सुरवात अतिशय सुखद असते कारण सुरुवात आपल्या कौतुक सोहळ्याने होते. आता कशी ते पहा.
स्थळ असते एखाद्या समारंभाचे जिथे वर्षानुवर्षे आपल्या कडे न फिरकणारे नातेवाईक ( sorry sorry आपण त्यांना  तर्हेवाईक म्हणायचे ठरवले आहे)   आले  असतात.  तिथे  ज्या  काही  Typical  बेबी मावशी, किंवा बेबी आत्या किंवा बेबी आज्जी  type च्या बायका असतात त्या आपल्या आईला अथवा बाबांना म्हणतात '" काय रे तुझा थोरला/थोरली  लेक कुठाय ?" मग आपण कुठे तरी चकाट्या पिटत असतो तिथून आपल्याला बोलावले जाते आणि आपण अगदी आपल कुणी तरी सख्खा सोयरी भेटल्या प्रमाणे त्याना नमस्कार करतो. आणि मग चमत्कार घडतो '" कित्ती मोठठा झालास रे, किती उंच दिसतोस किंवा मुलगी असेल तर किती गोड दिसते आहेस अगदी आई वर गेली आहेस हो... असे म्हणून आपल्याला मूठभर मांस चढत तोच पुढचा बॉम्ब पडतो. ते सगळ ठीक आहे आता काय लग्नाच्या हालचाली सुरु केल्या कि नाही. वेळीच कर हो. लग्न होई पर्यंत चांगली वर्षे दोन वर्षे जातात. बर्र आमच्या नंदू ची नात/ नातू लग्नाची आहे सांगू का ?" अस म्हणल्या नंतर सगळ्यात मोठी अडचण होते ती आपली कि यावर Positive  Recation अपेक्षित आहे की Negative . आणि आपले आई बाबा आपल्या मुलाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्या प्रमाणे कौतुकाने पाहत उभे  असतात.
बस तो आपल्या आनंदा चा शेवटचा दिवस असतो. मग आई बाबा असेल तर धाकटा भाऊ बहीण अगदी CID  प्रमाणे आपल्यावर नजर ठेवू लागतात  कशासाठी म्हणून काय विचार करताय  अहो आपल कुठे काय प्रेम प्रकरण आहे का  याचा अंदाज घेण्यासाठी. मग आपण  वारंवार  कुणाशी  फोन  वर  बोलतो,  कोण  सतत  आपल्या  घरी  येत,  कुणाचा फोन आला अथवा कोण घरी आल्यावर आपण Excite होतो  या सगळ्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जाते.
आणि मग पूर्ण शहानिशा केल्या नंतर जेंव्हा त्यांना कळून चुकत की आपल कार्ट किंवा कार्टी कुणाच्या ही प्रेमात बिमात पडले नाहीयेत. एक दिवस रीतसर आपली शाळा घेतली जाते किंवा आपल्या भाषेत सांगायचे झाले तर सुमडीत खोपच्यात घेतले जाते आणि मग ही Arrange  Marriage  ची कडू गोळी आपल्याला गोड साखरेत घोळवून खायला घातली जाते. मग लग्नाचे महत्व, त्याची योग्य वेळ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण ते आत्ता का करणे गरजेचे आहे या वर प्रबोधन केले जाते. बर्र जर आपण पहिल्याच प्रयत्नात Convince  झालो तर ठीक आहे. नाहीतर मग तुझे कुठे जमले आहे का? कुणी आवडते का ? लग्न तरी करायचे आहे का असे अनेक प्रश्न सकाळ संधाय्काळ आपला पाठलाग करू लागत्तात. आपण दिलेले कोणतेही कारण त्यांना खरे वाटत नाही. आई Serial मधील लग्न पाहून आपल्या कडे साश्रुपूर्ण नयनांनी पाहू लागते, बाबा बोलायचे कमी होतात, लहान बहिण आपल्या लग्नात काय घालणार याचे Planning करू लागते जे अगदी च आवरर्रा असे असते.पण आपण फक्त हतबल पणे या सगळ्या कडे पाहत असतो. हे सगळे उपाय संपले की मग जवळचा मामा, काका, दादा किंवा लग्न ठरलेले मित्र मैत्रिणी सामुपादेशाना साठी येऊ लागतात. मग इतक्या साऱ्या लोकांचे प्रयत्न पाहून आपण च माघार घेतो आणि एकदाचे लग्नाला तयार होतो. आणि मग काय सगळी कडे जल्लोषाला उधाण येते. क्षणात आपण घरातले Celebrity होतो.
पण Actual मध्ये बळीसाठी बकरा मिळाला असतो. ह्या बकऱ्याचा हलाल होई पर्यंतचा प्रवास Step By Step पुढच्या ब्लोग्स मध्ये पाहू
तोपर्यंत Goodbye and Take Care 
अधिष

Monday, March 26, 2012

प्रास्ताविक

मित्रांनो गध्ध्ये पंचविशी ओलांडून आपण खऱ्या अर्थाने गृहस्थ आश्रमा साठी applicable होतो आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वांना आपले लग्न या अलौकिक वेडाने झपाटून टाकल जात. या सर्वामध्ये ज्याचे लग्न करायचे आहे तो जणू काही गीनिपिक असल्या प्रमाणे आजूबाजूचे सगळे लोक आपल्या वर लग्नाचे प्रयोग सुरु करतात. त्यात जर तुम्ही love marriage करत असाल तर बऱ्याच त्रासातून मुक्ती मिळते पण जे लोक Arrange Marriage करण्याचा निर्णय घेतात ( घेतात कसला घ्यावा लागतो) त्यांना मात्र Emotions , Expectations आणि Unusual Reactions च्या महादिव्यातून जावे लागते.
आज काल वर्तमान पत्रातून, मासिकां मधून So Called विवाह समुपदेशनाचे लेख वाचल्या नंतर असे वाटते जणू आपली पिढी बिलकुल Mature च नाहीये. जे काही कळत ते या जुन्या खोडांनाच. No Doubt या मोठ्या लोकांनी नक्कीच चार पावसाळे जास्त पहिले असतात, खूप कटू गोड अनुभव त्यांच्या पाठीशी असतात, आपले चांगले व्हावे हीच त्याच्या मागची भावना असते. पण याचा अर्थ असा नाही की आमची पिढी लग्नाच्या बाबतीत सपशेल मूर्ख आहे, आम्ही जबाबदार नाही. अगदी आधीच्या पिढी इतके नाही पण आम्ही ही चार कटू गोड अनुभव आम्हीही घेतले आहेत. आमचे ही काही म्हणणे आहे. आम्हाला ही लग्न करायचे आहे पण आमच्या पद्धतीने आणि दृष्टीकोनाने ईतकच
माझ्या blogs च्या माध्यमातून मला हेच म्हणणे सगळ्यांचा समोर मांडायचे आहे. तेंव्हा हा blog हा केवळ माझा blog नाही हा आपल्या सगळ्यांचा आहे. जिथे आपण आपले विचार, भूमिका मांडू शकू ज्या आपण कधी कधी प्रत्यक्ष जीवनात मांडू शकत नाही.
Arrange  Marriage  ची जाचक आणि बेभरवशाची वाटणारी ही Process एक आनंददायी आणि Rembering Process बनवण्या साठी हा एक छोटासा प्रयत्न. मला आशा आहे हे Blogs  कुठेतरी तुमचेच अनुभव वाटतील. तेव्हा जरूर याचा आनंद घ्या आणि तुम्हाला ही तुमचे अनुभव Share करायचे असतील तर नक्की करा Blog तुमचाच आहे.
चला भेटूयात मग एक नवीन विचार आणि दृष्टीकोन घेऊन....
तोपर्यंत Goodbye and Take Care
अधिष