गाईड सिनेमात वहिदा रेहमान हे गाण गाते. तेंव्हा तिला तिच्या कंटाळवाण्या जगण्याला नवी उमेद, नवी आशा मिळाली असते. Arrange Marriage मधला हा टप्पा अगदी असाच असतो.लग्नासाठी सज्ज झालेलो आपण जेंव्हा या सत्याला सामोरे जातो, की जवळच्या लोकामध्ये काही आपली लग्नाची डाळ शिजणार नाही. तेंव्हा आपल्या मनाला आलेली काहीशी निराशा, स्वतःबद्दल आलेला infirioirity complex यामुळे पुरता नाहीसा होतो. तर आता तुम्हाला उत्सुकता लागून राहीली असेल की हा कुठला टप्पा बर्र ??
तर हा टप्पा असतो आपली लग्नाची दावेदारी आपल्या नातेवाइकान्च्या जगाच्या बाहेर जाहीर करण्याचा. ज्या विवाह संस्थेचा दिव्य form आपण भरला असतो ते आपली माहिती अतिसुंदर विशेषणां सकट त्यांच्या मासिकात/ रेजीस्टार/ किंवा आजकाल ची devlopment म्हणजे त्यांच्या website वर टाकतात. आणि विशेषणे पण कशी??मुलाच्या बाबतीत उंच ,उच्चशिक्षीत ,निर्व्यसनी (हा हा हा ) आणि मुलगी असेल तर सुंदर, उजळवर्ण, शालीन , सुसंस्कृत, गृहकार्तव्यदक्ष अशा शब्दबंबाळ विशेषणांनी नटून आपले SO CALLED MARRIAGE PROFILE तयार होते.आणि कुठल्याश्या मासिकात छापून येते. आई वडिलांच उर तो मजकूर वाचून भरून येते जणू काही मुलगा बोर्डात आला कि काय असे समजून ते तो मजकूर चार चारदा वाचतात.
मग जैसे पूरी कायनात बस इसी लम्हे का इन्तेजार कर रही थी अशा रीतीने आपल्याला attention मिळते. अचानक सकाळ , दुपार , संध्याकाळ घराचे फोन खणखणू लागतात. चारी बाजूनी स्थळांचा पाउस पडू लागतो. लग्नाच्या तळ्यातील आपण कुरूप पिल्लू नसून राजहंस असल्याची भावना मनात जागृत होते. आई वडील वधू अथवा वर पित्यांना फोटो आणि पत्रिका पाठवायची विनंती करू लागतात. आणि मग आपल्या मनात पुढची स्वप्नचित्रे दिसू लागतात. कि पुढच्या 8 दिवसातच आपल्या आयुष्यभराचा जोडीदार आपल्या समोर असणार आणि मग फक्त सुख, सुख आणि सुखच.
लग्नाच्या बाजारात अचानक प्राप्त झालेल्या मागणीने हुरळून जाऊन आपण ही गाऊ लागतो की सचमुच आज फिर जिने कि तमन्ना है.... लेकीन दोस्त ये शादीका बाजार भी बडी अनोखी चीज है. आने वाले दिनो मी वोह आपसे येभी बुलावायेगा कि आज फिर मरने का इरादा है.... बस किस्मत किस्मत का खेल है दोस्त आगे आगे देख होता है क्या!!!!!

No comments:
Post a Comment