Wednesday, March 28, 2012

वादळाची चाहूल......

वादळाची चाहूल.....
Arrange Marriage Process च्या वादळाची सुरवात अतिशय सुखद असते कारण सुरुवात आपल्या कौतुक सोहळ्याने होते. आता कशी ते पहा.
स्थळ असते एखाद्या समारंभाचे जिथे वर्षानुवर्षे आपल्या कडे न फिरकणारे नातेवाईक ( sorry sorry आपण त्यांना  तर्हेवाईक म्हणायचे ठरवले आहे)   आले  असतात.  तिथे  ज्या  काही  Typical  बेबी मावशी, किंवा बेबी आत्या किंवा बेबी आज्जी  type च्या बायका असतात त्या आपल्या आईला अथवा बाबांना म्हणतात '" काय रे तुझा थोरला/थोरली  लेक कुठाय ?" मग आपण कुठे तरी चकाट्या पिटत असतो तिथून आपल्याला बोलावले जाते आणि आपण अगदी आपल कुणी तरी सख्खा सोयरी भेटल्या प्रमाणे त्याना नमस्कार करतो. आणि मग चमत्कार घडतो '" कित्ती मोठठा झालास रे, किती उंच दिसतोस किंवा मुलगी असेल तर किती गोड दिसते आहेस अगदी आई वर गेली आहेस हो... असे म्हणून आपल्याला मूठभर मांस चढत तोच पुढचा बॉम्ब पडतो. ते सगळ ठीक आहे आता काय लग्नाच्या हालचाली सुरु केल्या कि नाही. वेळीच कर हो. लग्न होई पर्यंत चांगली वर्षे दोन वर्षे जातात. बर्र आमच्या नंदू ची नात/ नातू लग्नाची आहे सांगू का ?" अस म्हणल्या नंतर सगळ्यात मोठी अडचण होते ती आपली कि यावर Positive  Recation अपेक्षित आहे की Negative . आणि आपले आई बाबा आपल्या मुलाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्या प्रमाणे कौतुकाने पाहत उभे  असतात.
बस तो आपल्या आनंदा चा शेवटचा दिवस असतो. मग आई बाबा असेल तर धाकटा भाऊ बहीण अगदी CID  प्रमाणे आपल्यावर नजर ठेवू लागतात  कशासाठी म्हणून काय विचार करताय  अहो आपल कुठे काय प्रेम प्रकरण आहे का  याचा अंदाज घेण्यासाठी. मग आपण  वारंवार  कुणाशी  फोन  वर  बोलतो,  कोण  सतत  आपल्या  घरी  येत,  कुणाचा फोन आला अथवा कोण घरी आल्यावर आपण Excite होतो  या सगळ्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जाते.
आणि मग पूर्ण शहानिशा केल्या नंतर जेंव्हा त्यांना कळून चुकत की आपल कार्ट किंवा कार्टी कुणाच्या ही प्रेमात बिमात पडले नाहीयेत. एक दिवस रीतसर आपली शाळा घेतली जाते किंवा आपल्या भाषेत सांगायचे झाले तर सुमडीत खोपच्यात घेतले जाते आणि मग ही Arrange  Marriage  ची कडू गोळी आपल्याला गोड साखरेत घोळवून खायला घातली जाते. मग लग्नाचे महत्व, त्याची योग्य वेळ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण ते आत्ता का करणे गरजेचे आहे या वर प्रबोधन केले जाते. बर्र जर आपण पहिल्याच प्रयत्नात Convince  झालो तर ठीक आहे. नाहीतर मग तुझे कुठे जमले आहे का? कुणी आवडते का ? लग्न तरी करायचे आहे का असे अनेक प्रश्न सकाळ संधाय्काळ आपला पाठलाग करू लागत्तात. आपण दिलेले कोणतेही कारण त्यांना खरे वाटत नाही. आई Serial मधील लग्न पाहून आपल्या कडे साश्रुपूर्ण नयनांनी पाहू लागते, बाबा बोलायचे कमी होतात, लहान बहिण आपल्या लग्नात काय घालणार याचे Planning करू लागते जे अगदी च आवरर्रा असे असते.पण आपण फक्त हतबल पणे या सगळ्या कडे पाहत असतो. हे सगळे उपाय संपले की मग जवळचा मामा, काका, दादा किंवा लग्न ठरलेले मित्र मैत्रिणी सामुपादेशाना साठी येऊ लागतात. मग इतक्या साऱ्या लोकांचे प्रयत्न पाहून आपण च माघार घेतो आणि एकदाचे लग्नाला तयार होतो. आणि मग काय सगळी कडे जल्लोषाला उधाण येते. क्षणात आपण घरातले Celebrity होतो.
पण Actual मध्ये बळीसाठी बकरा मिळाला असतो. ह्या बकऱ्याचा हलाल होई पर्यंतचा प्रवास Step By Step पुढच्या ब्लोग्स मध्ये पाहू
तोपर्यंत Goodbye and Take Care 
अधिष

No comments:

Post a Comment