Friday, May 4, 2012

घर की मुर्गी....

घर की मुर्गी....
Arrange Marriage मध्ये आई वडिलांचा एक जगावेगळा हट्ट असतो कि होणारी सून अथवा जावई हा  महितातला  अगदी  रोजच्या  पाहण्यातला  असला  पाहिजे.  का  विचारलं  तर  म्हणे  माहिती  मधला  मुलगा  अथवा  मुलगी  असली  की  भविष्यातली  Risk  कमी  होते.  मला  एक  कळत  नाही  दररोज  आपल्या समोर वावरणारी ही मुले आणि मुली उत्तम पती अथवा  गृहिणी  होतील  हे  कशा  वरून?  असे  असत तर विवाह जुळवणाऱ्या संस्था ओसच पडल्या असत्या ना?? पण नाही  हट्टाला  पेटलेल्या  आई  वडिलांना  समजावणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्या प्रमाणे असते तेंव्हा या फंदात न पाडलेल च बर.
तर मिशन घर की "मुर्गी" अथवा "बकरा" शोधण्याचे काम सर्व जण सुरु करतात. यात पहिले टार्गेट असतात आई वडिलांच्या मित्र मैत्रिणीची मुले व मुली (सौजन्य हिंदी सिनेमासृष्टी जे दोस्ती को रीश्तेदारी मध्ये बदलण्याचे फुटकळ प्रकार दाखवतात) त्या मध्ये सुद्धा मुले मुली अनेक असतात त्यातल्या त्यात आई वडिलांना कोण आवडतात यावर सगळा खेळ अवलंबून असतो. या सगळ्या  Selection  Process मध्ये केवळ मुलगी अथवा मुलगी चांगले असून चालत नाही तर त्यांच्या आई वडिलांबरोबर असणारे संबंध ही खूप महत्वाचे असतात  नाहीतर  आपल्याला  आवडणाऱ्या  मुलीच्या  आणि  आपल्या आई चा ३६ चा आकडा असेल तर ब्रम्हदेव ही  खाली  येऊन  तुमचे  लग्न  जुळवू  शकत   नाही. तर एकदा ही दोस्ती रीश्तेदारी front  वर आई वडिलांना अपयश आले की मग आई बाबा मोर्चा नातेवाईकाकडे वळवतात. मग आईच्या  आत्ये  बहिणीच्या  चुलत  नणंदेची  मुलगी,  बाबांच्या  मामींचा  बहिणीचा मुलगा अशी दूर दूर वर आपली स्थळे जातात. त्यातल्या त्यात आई  वडिलांनी  कुठल्या  लग्नात पाहिलेली ती हिरव्या साडीतली मुलगी किंवा चष्मेवाला तो मुलगा असे शोध सुरु होतात. लहान बहिण भाऊ असतील तर ते ही त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या भावंडाना सुचवून मोकळे होतात. या सगळ्या मध्ये आपल्याला मात्र आपले मत देण्याचा अधिकार कुठेच नसतो आपण मात्र रोज एका नवीन ठिकाणी आपले सुंदर सुंदर photos आणि पत्रिका पोस्त करण्याचे काम अतिशय उत्साहाने करायचे असते.
तरी त्यातला त्यात आपल्याला विचारले की बाबा रे तूला कुणी आवडली आहे का आपल्या महितातली तर आपल्या कडे उत्तर च नसते कारण आपली झेप फार फार तर वाहिनीच्या बहिणी पर्यंत ( सांगायला नको सौजन्य हम आपके है कौन) नाहीतर तिच्या मैत्रिणी पर्यंत पण तिथे ही आपली कीर्ती इतकी चांगली पोहोचली असते की पुन्हा आई वडिलांचा अपमान नको म्हणून आपण गप्प बसतो.
तर या टप्प्या मध्ये ज्या लोकांचे लग्न जुळते त्यांनी मागील जन्मी मोती दान केले आहे असे नक्की समजावे कारण ओळखीतून लग्न जुळणे हे तुमच्या लेखी तेवढे पुण्य जमा असेल तरच होते. आणि अशा वेळी आई वडिलांना सिकंदराला नवा देश सापडल्या नंतर जितका आनंद होईल तितका आनंद, अभिमान आणि गर्व होतो. आणि ज्यांचे लग्न या टप्प्यात जुळत नाही त्यांनी समजावे अजून त्यांच्या पापाचा हिशोब चुकता व्हायचा आहे आणि येणाऱ्या काळात तो होणार हे नक्की.....
येह तो ट्रेलर है....पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त......
अधिष